राज ठाकरे बोलक्या बाहुल्यासारखे ...


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैनिकांच्या नावावरून राजकारण करण्याचे वक्तव्य केल्याचा व्हीडिओ राज ठाकरेंनी दाखवला. मात्र तो व्हीडिओ अर्धवट असल्याची टीका मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. मोदींना विचारण्यात आलेला प्रश्न आणि त्यांनी दिलेले उत्तर यामध्ये काटछाट करण्यात आली आहे. त्यामुळे राज हे रामदास पाध्येंच्या बोलक्या बाहुल्यांसारखे अर्धवटराव आहे का? असा खोचक टोला शेलार यांनी लगावला. शनिवारी दुपारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित सभेत ते बोलत होते.
‘शेतकरी मेले तर राजकारणाचा मुद्दा पण सैनिक मेले तर राजकारणाचा मुद्दा का नाही?’ असे वक्तव्य करतानाचा मोदींचा व्हीडिओ राज यांनी दाखवला. मात्र शेलार यांनी मोदींचा मुलाखतीचा मूळ व्हीडिओ दाखवला.

‘आपल्या देशात अनेक मुद्दे आहेत. मग तो शेतकरयांचा मुद्दा असो किंवा जवानांच्या सुरक्षेचा मुद्दा असो. शेतकरी मेले तर राजकारणाचा मुद्दा मग सैनिक मेले तर राजकारणाचा मुद्दा का नाही होऊ शकत. आपल्या देशाचे सैन्य मजबूद होईल या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशावर जेव्हापण अतिरेकी हल्ला झाला आहे तेव्हा आपल्या सैनिकांचे आतोनात हाल झाले आहेत. त्यामुळे यावर का नाही बोलायचं?’ अशी प्रतिक्रीया मोदींनी दिली असल्याचा मूळ व्हीडिओ यावेळी शेलारांकडून दाखवण्यात आला.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget