पंतप्रधानपदासाठी शरद पवारांनी सुचवली तीन नावे, राहुल गांधींचे नाव नाही! 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबाबत मोठे वक्तव्य केले आहे. जर २०१९ मध्ये एनडीएला बहुमत मिळाले नाही तर ममता बॅनर्जी, मायावती आणि चंद्राबाबू नायडू यांच्यापैकी एक देशाचा पुढील पंतप्रधान असू शकतो. 

या तीन नेत्यांनी आपापल्या राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. त्यामुळे ते पंतप्रधानपदाचे सर्वात मोठे दावेदार असतील असे पवारांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना पवारांनी याबाबत भाष्य केले. पवारांनी या सर्व प्रकरणात राहुल गांधी यांचे नावही घेतले नाही.

पंतप्रधानपदासाठी आपण कोणत्या तीन नेत्यांना संधी आहे असे मानता? असे शरद पवारांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी ममता बॅनर्जी, मायावती आणि चंद्राबाबू नायडू यांची नावे घेतली. तसेच या नेत्यांना राज्य चालविण्याचा व प्रशासनाचा अनुभव असल्याचे सांगितले. या कारणामुळेच पवारांनी त्यांची नावे घेतली. ममता बॅनर्जी 2011 पासून बंगालच्या मुख्यमंत्रीपदी आहेत तर चंद्रबाबू नायडू यांनी दोनदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. तर मायावती यांनी उत्तर प्रदेशचे चार वेळा मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget