नगर शहराच्या मध्यवर्ती भागात सोमवारी पाणी सुटणार नाही

Image result for पाणी सुटणार नाही

वीज पुरवठा खंडीत झाल्याने वेळापत्रकात बदल !

अहमदनगर : महापालिकेच्या शहर पाणी योजनेवर शनिवारी दिनांक २७/४/२०१९ रोजी  महावितरणकडून होणार्‍या वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता मध्यरात्री १२ : ३० नंतर वीजपुरवठा सुरळीत झाल्यामुळे वसंत टेकडी व सरोष टाकीवरुन होणारा पाणीपुरवठा रविवारी दिनांक २८/४/२०१९ रोजी बंद होता. या भागात सोमवार  दिनांक २९/४/२०१९ रोजी पाणी सोडले जाणार असल्याने रोटेशननुसार पाणीवाटप असलेल्या भागातील पाणीपुरवठा सोमवारी ऐवजी मंगळवारी दिनांक ३०/४/२०१९ रोजी होणार आहे. शनिवारी सायंकाळी ५ : १५ वाजता शहर पाणीपुरवठा योजनेवरील वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे पाणी उपसा बंद होता. मध्यरात्री १२ : ३० नंतर पाणी उपसा सुरू होऊन पहाटे ५ वाजता पाणीपुरवठा सुरळीत झाला. परिणामी, सरोष टाकी व वसंत टेकडी येथून पाणीपुरवठा झाला नाही. या टाक्यांवर अवलंबून असलेल्या भागात आज सोमवारी पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे सोमवारी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराचा मध्यवर्ती भागातील लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळेरोड, आनंदी बाजार, कापड बाजार, तोफखाना, सर्जेपुरा, माळीवाडा इत्यादी भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या भागात मंगळवारी पाणी सोडण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget