व-हाडच्या बसला अपघातजामखेड : मुबंई येथून लग्न समारंभ आटपून यवतमाळकडे परतणा-या व-हाडच्या लक्झरी बसचा अपघात झाला आहे. बसच्या पाठीमागुन आलेल्या मालट्रकने दिलेल्या जोराच्या धडकेने झालेल्या या अपघातात १७ जण जखमी झाले असून यापैकी एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात जामखेड तालुक्यातील आनंदवाडी शिवारात सोमवारी पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास घडला. सुदैवाने या अपघातात मोठी जीवित हानी टळली.

मुंबईहून लग्न समारंभ आटपून यवतमाळ जिल्ह्यातील आपल्या गावी परतणारया वरहाडी मंडळींच्या लक्झरी बसला शिर्डी हैद्राबाद मार्गावरील जामखेड तालुक्यातील आनंदवाडी शिवारात हा अपघात झाला. अपघातग्रस्त लक्झरी बसला जामखेडहून पाटोदा मार्गे यवतमाळकडे जायचे होते. परंतु या बसचा रस्ता चुकल्याने ही बस शिर्डी हैद्राबाद मार्गाने चालली होती.

 बस जामखेड तालुक्यातील आनंदवाडी शिवारात आली असता लक्झरी चालकाने बस थांबवून रस्ता विचारण्यासाठी तो खाली उतरला होता. दरम्यान याचवेळी जामखेडकडून खर्ड्याच्या दिशेने जाणारया मालट्रकने लक्झरी बस क्रमांक एम एच ०१ एएन ८०९७ला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत लक्झरीची पाठीमागील बाजुचा अक्षरशा: चुराडा झाला.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget