राज ठाकरेंच्या नावाने शिमगा का करता?’



मुंबई: 1980 सालच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने एक देखील जागा लढवली नव्हती. शिवाय त्याच निवडणुकीत सेनेने काँग्रेसला समर्थन दिले होते. आज राज ठाकरे देखील एकही जागा लढवत नाहीये, मग त्यांच्या नावाने शिमका कशाला करता? असा सवाल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी भाजप-शिवसेनेला विचारला आहे.
गुढी पाडव्याच्या मनसेच्या मुंबईतील मेळाव्यात राज ठाकरे यांनी मोदी- शहा यांना राजकीय क्षितीजावरून संपविण्याचे आवाहन केले आहे. तसेच राज ठाकरे भाजपविरोधात मतदान करण्यासाठी राज्यातील १०-१२ प्रमुख ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत.

राज ठाकरे यांनी मुंबईत पाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर भाजप-शिवसेना हादरली होती. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर भाजप- शिवसेनेचे नेते तोंडसुख घेत आहेत. उत्तर मुंबईचे भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी तर ‘बेगाने शादी में अब्दुला दिवाना’ असे म्हणत टीका केली होती. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर राज यांना बारामतीचा पोपट म्हणत गोविंदबागेतून भाषणाची स्क्रिप्ट येते असे म्हटले होते. आशिष शेलार, विनोद तावडे यांच्यासह अनेक नेत्यांनी राज यांच्यावर टीका केली. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीची सुपारी घेतल्याची टीका केली.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget