शिववसेनेकडे माणसं कमी गुंडच जास्त, त्यांनाच घेऊन फिरतात!


कणकवली : आमच्यावर दहशतवादाचा आरोप करणारे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सभांना गुंडांची उपस्थिती होती.शिवसेनेला माणसेच मिळत नसल्याने गुंड घेऊन फिरण्याची वेळ आली आहे.

आम्ही मात्र विकासाच्या मुद्दयावर निवडणूक लढविली.त्यामुळे जनता आमच्या पूर्ण पाठीशी राहिल.निलेश राणे ६० हजाराच्या मताधिक्याने निवडणून येतील असा विश्‍वास खासदार नारायण राणे यांनी वरवडे येथे व्यक्त केला.

माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यानी वरवडे फणसनगर येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.याप्रसंगी त्यांच्या समवेत सौ.निलमताई राणे,सौ.प्रियांका राणे यांच्यासह स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मतदानाचा हक्क बजावण्यापुर्वी खास.नारायण राणे यानी वरवडे येथील आपल्या निवासस्थानी भेट देऊन देवदर्शन घेतले होते. नंतर मतदानस्थळी दाखल होत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

श्री.राणे म्हणाले, गेली ३० वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत.जिल्ह्याचा विकास करत असताना जात,पात,धर्म न मानता जिल्हा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवुन काम केले.त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी मतदार निश्‍चितपणे डॉ.निलेश राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget