आईचे नाव मतदार यादीत नसल्याने समीर भुजबळांची नाराजी, छगन भुजबळांकडे मतदारांच्या तक्रारी

Image result for छगन भुजबळ

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, उमेदवार समीर भुजबळ यांच्यासह कुटुंबीयांनी आज नाशिकच्या जुने सिडको परिसरातील ग्रामोदय विद्यालय याठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान उमेदवार समीर भुजबळ यांच्या मातोश्री हिराबाई भुजबळ यांचे नाव मतदार यादीत नाव नसल्याने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व उमेदवार समीर भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससह मित्रपक्षांच्या आघाडीकडून समीर भुजबळ हे निवडणूक लढवीत आहेत. आज सकाळपासूनच समीर भुजबळ व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहर व परिसरातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या. त्यानंतर सकाळी १० वाजता माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या कुटुंबीयासोबत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी उमेदवार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, डॉ. जितेंद्र वाघ, मीनाताई भुजबळ, डॉ. शेफाली भुजबळ, विशाखा भुजबळ, दुर्गाताई वाघ यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र, समीर यांच्या आई हिराबाई भुजबळ यांचे नाव मतदार यादीत नसल्याने भुजबळ चुलते-पुतण्याने नाराजी व्यक्त केली.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget