हिंमत असेल तर त्यांच्या नावाने मते मागा : जितेंद्र आव्हाडजळगाव : दहशतवादाचा उगम असलेला नथुराम गोडसे आणि त्याची पिलावळ म्हणजे हे भाजपाचे लोक आहेत. या निवडणुकीमध्ये भारताच्या व भारताच्या लोकशाहीच्या भविष्याचा निर्णय होणार आहे. यांच्याकडे धनशक्तीचा वापर मोठया प्रमाणावर होतो, ही मगरूरी भाजपात वरपासून खालपर्यंत सुरु आहे. तुम्ही गोळवलकर गुरुजींच्या शाळेत शिकला आहात. आम्ही गांधीचे शिष्य आहोत. हिंमत असेल तर गोळवलकरांच्या नावाने मते मागा आम्ही गांधीजींच्या नावाने मागतो. मग निकाल पाहा काय लागतो, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर केली आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ आज चाळीसगाव येथे जाहीर सभा पार पडली. त्यावेळी आव्हाड बोलत होते. यावेळी आमदार आव्हाड यांनी मोदींवर सडकून टीका केली.

आव्हाड म्हणाले की, सन २०१४ साली मोदींनी प्रत्येक भाषणात देशाला केवळ स्वप्ने दाखवण्याचे काम केले. हे एकप्रकारचे मृगजळ होते आणि त्यामागे जनता लागली. पाच वर्षांत कोणती कामं केली यावर पंतप्रधान मोदी काहीच बोलत नाहीत, पण पाकिस्तानच्या विषयावर मोदी मत मागतात. त्यांच्याकडे बाकी मुद्देच नाहीत. देशात सर्वच आलबेल आहे असं समजू नका असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सांगतात. निवडणूक आयोगाने नमो टीव्ही बंद करण्याचे आदेश दिले असतानादेखील त्याचे उल्लंघन करण्याचे काम मोदी सरकार करत आहे. कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे. मोदींच्या काळात सर्वोच्च न्यायालय, आरबीआय, सीबीआय, निवडणूक आयोग या देशाच्या सर्वोच्च संस्था धोक्यात आल्या आहेत, अशी टीकादेखील जितेंद्र आव्हाड यांनी केली. पुलवामा घटनेचा हिशोब देशाला हवाय. याला जबाबदार कोण याचे उत्तर आपण द्यावे, ही जनतेची अपेक्षा आहे. भावनांचे राजकारण करण्याचे काम मोदी करत आहेत असेही आव्हाड म्हणाले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget