विखे पाटील हे विरोधी पक्षनेते नाही, तर पक्षविरोधी नेते आहेत!




शिर्डी : राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते नाही, तर पक्षविरोधी नेते आहेत, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीतील आघाडीच्या पहिल्याच प्रचारसभेत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना टोला लगावला.


ज्यांच्यावर पक्षाने जबाबदारी दिली, तेच चुकीचे वागत आहेत, असं म्हणत थोरातांनी विखेंना घरचा आहेर दिला. विधानसभेत भाषण झालं का विरोधी पक्ष नेते मुख्यमंत्र्यांच्या दालनात असायचे, असा दावाही थोरातांनी केला.


शिर्डी विधानसभेतील जनताही काँग्रेसच्या पाठीशी उभी राहील. विरोधी पक्षनेते आज या व्यासपीठावर पाहिजे होते. ते काँग्रेसला ताकद देण्याऐवजी ताकद दाखवायचं आव्हान देत आहेत, अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांवर घणाघाती टीका केली.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात थोरातांनी आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. संगमनेर तालुक्यातील निझर्णेश्वरमध्ये आयोजित विजय निर्धार सभेत ते बोलत होते. 

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget