'भाजपला मतदान करा,' असे आवाहन करणारा अधिकारी निलंबितपुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी केंद्रावर नियुक्ती करण्यात आलेल्या अधिकाऱ्यानेच मतदारांना 'भाजपला मतदान करा,' असे आवाहन केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. 


लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यातील कसबा मतदारसंघातील बूथ क्रमांक १८८ वर निवडणुकीच्या कामासाठी शिक्षक राजेश प्रकाश भाेसले यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांनी भाजपलाच मतदान करण्याचे आवाहन सुरू केल्याचे काँग्रेस कार्यकर्त्याच्या निदर्शनास आले. त्यांनी लागलीच त्याला रंगेहाथ पकडून पाेलिसांच्या स्वाधीन केले. 

दरम्यान, पुण्याचे जिल्हाधिकारी तसेच मुख्य निवडणूक अधिकारी नवल किशाेर राम यांनी याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यास निलंबित करून याबाबतची चाैकशी करण्याचे आदेश दिले आहे. याप्रकरणी बाळासाहेब अमराळे यांनी कसबा विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणुक अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे. अमराळे हे मंगळवारी दुपारी १ वाजता शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये मतदार रांगेत उभे हाेते. त्या वेळी निवडणूक अधिकारी असलेले राजेश भाेसले हे त्या ठिकाणी भाजपचा प्रचार करत असल्याचे त्यांनी अनुभवले. भाजपला मतदान करा आणि पुलवामा हल्लाप्रकरणी  एअर स्ट्राइक ज्या सरकारने केला त्यांना मतदान करा, असे भोसले मतदारांना सांगत होते. 


याबाबतची तक्रार झाेनल अधिकारी एस.पी.गायकवाड यांच्याकडे संबंधिताने केल्यानंतर भाेसले यांना पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या वेळी काँग्रेसचे उमेदवार माेहन जाेशी हेही घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी भाेसलेंविराेधात लेखी तक्रार देण्यास अमराळे यांना सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तातडीने याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याला कार्यमुक्त करण्यात आले व चाैकशी करून तथ्य आढळल्यास कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी स्पष्ट केले आहे.

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget