घरात मुलीचे लग्न, निर्दयी बापाने आईला संपवले
कल्याण : मुलीचे लग्न अवघ्या ११ दिवसांवर आलेले. घरात आनंदाचे वातावरण. मात्र किरकोळ कारणातून झालेल्या भांडणात मुलीच्या बापाने तिच्या आईलाच ठार मारले. आईला सोडवण्यासाठी गेलेली उपवर मुलगीही गंभीर जखमी झाली आहे. लग्नाच्या तयारीत आनंदाने न्हाऊन निघालेल्या घरात सध्या शोककळा पसरली आहे. अंगावर शहरे आणणारी ही घटना कल्याण पश्चिमेकडील ठणकरपाडा परिसरात घडली.

कल्याण पश्चिमेतील ठाणकरपाडा परिसरात राहणाऱ्या महाजन कुटुंबीयात आनंदाचे वातावरण होते. त्यांची मुलगी गौरवीचे ८ मे रोजी लग्न होणार होते. घरात लग्नाची तयारी सुरु होती. गुरुवारी रात्री गौरवीचे वडील रिक्षा चालक मोहन महाजन यांचे पत्नी मनीषा महाजन यांच्याशी किरकोळ कारणावरून भांडण झाले. या वादानंतर मोहन महाजन याने धारदार शस्त्राने आपल्या पत्नीवर वार केले. एवढेच नाही तर आईला वाचविण्यासाठी गेलेल्या गौरवीवरही मोहनने ६ वार केले. या घटनेत मनीषा महाजन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर गौरवी मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget