विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करा - निवडणूक आयोग



मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगल्यावर जाहिरनामा प्रसिद्ध करून आचारसंहितेचा भंग केला. 

तपासात तसं सिद्ध झालं आहे. त्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस आता याबाबत कारवाई करतील, अशी माहिती मुंबई शहराचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर बैठक झाल्याचीही तोंडी तक्रार आली होती. पण तपासाअंती त्यात तथ्य आढळलं नाही, असंही निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं. निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी पत्रकार परिषद घेऊन दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाबाबत माहिती दिली. या दोन्ही मतदारसंघातून प्रत्येकी दोन उमेदवारांनी माघार घेतली आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget