'स्वराज्य रक्षक संभाजी'मधील अभिनेत्रीचं हॉटेल त्यात फक्त एवढ्या रुपयात फुल जेवण

Image result for अश्विनी महांगडे

मुंबई: मुंबईसारख्या शहरात दोन वेळचं जेवण मिळावं म्हणून अनेकांना 12-12 तास ऊन-वारा-पाऊस कशाचीही तमा न बाळगता भटकंती करावी लागते. अनेक नामांकित हॉटेल्समध्ये पोटभर जेवण जेवण्यासाठी आपल्याला चांगलेच पैसे मोजावे लागतात.

 पण एक अशी व्यक्ती आहे की जिने सामाजिक भान जपत केवळ 40 रुपयांमध्ये भरपेट जेवण मिळेल अशी व्यवस्था केली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये राणू अक्काची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेने स्वत:चे नवीन हॉटेल सुरु केलं आहे.

सामाजिक भान जपत अश्विनीनं ‘स्वराज्य परिपूर्ण किचन’ हे हॉटेल सुरु केले आहे. स्वराज्य परिपूर्ण किचनमध्ये ‘स्वराज्य थाळी’ ही खास थाळी तुम्हाला मिळणार आहे. या थाळीचं वैशिष्ट्य म्हणजे ही थाळी फक्त 40 रुपयांना आहे. संपूर्ण जेवण तेही फक्त 40 रुपयांना ऐकून नवलं वाटलं ना…पण ते साहाजिकच आहे. कारण आजच्या महागाईच्या दिवसांत 40 रुपयांमध्ये जेवणाची परिपूर्ण थाळी मिळणं हे थोडं कठीणच आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget