रोहित पवारांचा भाजपाला दे धक्काअहमदनगर : लोकसभा निवडणुकीत विजयाचा सारीपाट मांडण्यासाठी राजकीय खेळ्यांना वेग आला असुन या फोडाफोडीच्या राजकीय धुळवडीत जामखेड तालुक्यात रोज एक राजकीय भूकंप होताना दिसत आहे. 

पालकमंत्री प्रा राम शिंदे यांच्या मतदारसंघ असलेल्या कर्जत – जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते तथा पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहितदादा पवार यांनी अनेक बडे मासे गळाला लावत बेरजेच्या राजकारणात आघाडी घेतल्याचे सध्याचे चित्र आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी जामखेड तालुक्यातील अनेक गावांना भेटी देत लोकसभेचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यासाठी साखर पेरणी करत जनतेशी संवाद साधला.

जामखेड तालुक्यात राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी रोहितदादा पवार यांनी कंबर कसली असुन पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत पालकमंत्री प्रा राम शिंदे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक असलेले बाजार समितीचे संचालक त्रिंबक कुमटकर, नान्नज ग्रामपंचायतचे सदस्य सागर पवार, राजेवाडी गावचे उपसरपंच भाऊसाहेब कुमटकर, भाजपाचे कट्टर कार्यकर्ते आप्पासाहेब मोहोळकर, पोपट चव्हाण, धनंजय कुमटकर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपातून राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केल्याने रोहित पवारांनी हाती घेतलेल्या बेरजेच्या राजकारणाला मोठे यश येताना दिसत आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget