बंडखोरांमुळे शिवसेना-भाजप युतीची डोकेदुखी वाढणारनाशिक/ अहमदनगर  : बंडखोरांमुळे शिवसेना-भाजप युतीची डोकेदुखी वाढणार आहे. नाशिक आणि शिर्डी मतदारसंघात बंडखोरी रोखण्यात भाजपला अपयश आलंय. शिर्डी मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 8 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. 

तब्बल 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर नाशिकमध्येही भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी त्यांचा अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवलाय.

शिर्डीत भाजपचे बंडखोर भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांनी अर्ज मागे न घेतल्याने भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांची डोकेदुखी वाढली आहे. पक्ष नेतृत्वाने वाकचौरे यांचा अर्ज माघारी घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यात अपयश आलं. त्यामुळे शिर्डीत आता पंचरंगी लढत होणार असल्याचं चित्र दिसून येतंय.

युती झाल्याने भाजपकडून इच्छुक असलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची पंचायत झाली होती. सध्या भाऊसाहेब वाकचौरे भाजपमध्ये असून भाजप कोट्यातून ते साईबाबा संस्थानचे विश्वस्त आहेत. शिवसेनेकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी घोषित झाल्याने वाकचौरे यांनी बंडाचं निशाण फडकावत अपक्ष उमेदवारी दाखल केली.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget