अभिषेक वर्माला सुवर्णपदक : ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला भारताचा पाचवा नेमबाजबीजिंग : चीनमध्ये सुरू असलेली आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धा भारताच्या नेमबाजांसाठी ‘लकी’ ठरली आहे. युवा नेमबाज अभिषेक वर्माने १० मीटर एअर पिस्तोल प्रकारात सुवर्णपदक पटकावताना २०२० टोक्यो ऑलिम्पिकसाठी प्रवेश निश्चित केला.

पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तोल प्रकारात शनिवारी अभिषेकने २४२.७ गुण मिळवत अव्वल स्थानासह सुवर्णपदकावर नाव कोरले. रशियाचा अर्टेम केर्नोसोवने (२४०.४ गुण) रौप्य आणि दक्षिण कोरियाच्या सेउंगवु हॅनने (२२० गुण) कांस्यपदक मिळवले. अभिषेकसह शझहर रिझवी आणि अर्जुन सिंग चीमा अंतिम फेरीत दाखल झाले होते. मात्र त्यांना अनुक्रमे ३२ आणि ५४व्या स्थानी समाधान मानावे लागले.

मायदेशात (नवी दिल्ली) झालेल्या पदार्पणातील विश्वचषक स्पर्धेत अभिषेकला खेळ उंचावता आला नाही. तो पात्रता फेरीतच बाहेर पडला. मात्र, आशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पणात अभिषेकने कांस्यपदकाची कमाई केली होती.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget