तुम्हाला देशात दोन पंतप्रधान मान्य आहेत का? - नरेंद्र मोदीअहमदनगर : तुम्हाला देशात दोन पंतप्रधान मान्य आहेत का? जम्मू-काश्मीरचे दोन तुकडे होऊ द्याल का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला.

 तसेच, काँग्रेस-राष्ट्रवादीचे घोटाळे आणि अजित पवारांची लाज आणणारी वक्तव्य, हीच विरोधकांची ओळख आहे, असाही निशाणा पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर साधला. या सभेत पंतप्रधान मोदींनी गेल्या पाच वर्षातील कामांचा पाढा वाचतानाच, शरद पवार, अजित पवार, राहुल गांधी यांच्यासह विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

अहमदनगरमध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे भाजप उमेदवार सदाशीव लोखंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. या सभेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुजय विखे पाटील, सदाशीव लोखंडे, बबनराव पाचपुते, राम कदम यासंह भाजपचे मोठे नेते उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget