संभाजी महाराजांचे स्मारक पूर्ण करणार : निलेश राणे

Image result for निलेश राणे

देवरूख : शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या नावावर केवळ मते मागितली. सत्तेची पदे उपभोगली, राजकारण केले; परंतु छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, छत्रपती संभाजी महाराजांसाठी शिवसेनेने काय योगदान दिले.

 याच संगमेश्वरात छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक धूळखात पडले आहे; परंतु हे स्मारक मात्र या सत्ताधा-यांना कधी दिसलेच नाही. या स्मारकावरील धूळ झाडायला, महाराजांच्या स्मृतींचे पावित्र्य राखायला निलेश राणेच तिथे गेला होता. त्यामुळे हे स्मारक मीच पूर्ण करणार आहे, असा विश्वास रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांनी येथे व्यक्त केला.

मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर येथील पावटा मैदानावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची प्रचारसभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, संदीप कुरतडकर, डॉ. मिलिंद कु लकर्णी, तालुकाध्यक्ष बापू सुर्वे आदी उपस्थित होते. जनतेला विकासापासून वंचित ठेवत केवळ सत्तेचे राजकारण करणा-या शिवसेनेचा चेहरा निलेश राणे यांनी उपस्थितांसमोर उघडा केला. निलेश राणे म्हणाले, उद्या देवरूखमध्ये सेना पक्षप्रमुखांची सभा आहे.

 ते येणार, दोन्ही हात लांब करून, कोकण हे माझे घर आहे, मी माझ्या घरी आलोय सांगणार आणि तुम्हाला भावनिक साद घालणार. पण तेव्हा त्यांना एकच प्रश्न करा, तुम्ही घरात वर्षातून फक्त दोनदाच का येता. या घराचा तुम्ही किती विकास केला आहे. शिक्षकांकडून पैसे घेणारा उपसभापती आणि नॉनमॅट्रिक खासदार देऊन आमचा विकास का रखडवला, असे प्रश्न करा, असे आवाहन निलेश राणे यांनी उपस्थितांना केले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget