कोकणात राणेंनी जपला स्वाभिमान , भाजप नेते आशिष शेलारांच्या ट्विटमुळे शिवसेनेच्या पोटात गोळा

Image result for आशिष शेलार


मालवण : राज्यातील भाजप सरकार मधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांमधील कडव्या लढतीमुळे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील निकालाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

 या मतदार संघात काय होणार ? कोण बाजी मारणार ? याविषयी उत्सुकता असतानाच भाजपचे कोकणातील ज्येष्ठ नेते आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी गुरुवारी सायंकाळी स्वाभिमानच्या उमेदवारीचे समर्थन करत राणेंनी कोकणात आपला उमेदवार उभा करून स्वाभिमान जपल्याचे म्हटले आहे. शेलारांच्या या ट्विटमुळे शिवसेनेच्या पोटात गोळा आला आहे.

रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघात भाजप सरकार मधील घटक पक्ष आणि सहयोगी पक्ष यांच्यातच कडवी लढत पहायला मिळाली. या मतदार संघात भाजप- शिवसेना युतीकडून शिवसेनेचा उमेदवार उभा असल्याने आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक खा. नारायण राणे हे भाजपचे राज्यसभा सदस्य असल्याने स्वाभिमान आपला उमेदवार येथून उभा करणार नाही, असा दावा शिवसेनेकडून करण्यात येत होता.

मात्र प्रत्यक्षात स्वाभिमान कडून माजी खासदार निलेश राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तसेच या उमेदवारीला भाजपच्या कोणत्याही राज्यस्तरीय नेत्याने विरोध केला नाही. अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अन्य विभागात सभा घेतल्या असताना रत्नागिरी- सिंधुदुर्गात प्रचाराला येणे टाळले. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, विनोद तावडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभेला उपस्थिती दर्शवली, पण राणेंवर टीका करणे टाळले. त्यामुळे स्वाभिमानच्या उमेदवारीला भाजपचे छुपे समर्थन होते का ? असा प्रश्न निर्माण झाला होता.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget