उर्मिलाच्या रॅलीत पुन्हा ‘मोदी मोदी’ घोषणा!



मुंबई : काँग्रेसच्या उत्तर मुंबई मतदार संघातील उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या बोरिवली येथील रॅलीत भाजप कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केल्याचा प्रकार घडला. या सर्व प्रकारावर उर्मिला चांगल्याच संतापल्या असताना दुसरयाच दिवशी पुन्हा त्यांना अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले. मंगळवारी कांदिवली पूर्व येथे प्रचारासाठी उर्मिला आल्या असताना काही भाजप कार्यकर्त्यांनी ‘मोदी मोदी’ अशा घोषणा दिल्या.

सोमवारी बोरिवली येथे उर्मिला प्रचारासाठी आल्या असताना भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. तसेच त्यांना अश्लील नृत्य करून दाखवत ह्यमोदी मोदीह्णच्या घोषणा दिल्या. यामुळे तेथील काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणी उर्मिलाने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली असून पोलिस संरक्षणाचीही मागणी केली आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget