भिवंडी,पालघरमध्ये आजी-माजी खासदारांत संघर्षवाडा : भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील व महाआघाडीचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्यात प्रमुख लढत होत आहे.तर पालघर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे राजेंद्र गावित व महाआघाडीकडून बविआचे बळीराम जाधव यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीकडून होणारी भाजपविरोधी मतांची विभागणी काँग्रेसच्या अडचणीत भर टाकणारी आहे. त्याचबरोबर भाजप उमेदवाराला सेनेचे सहकार्य कितपर्यंत लाभतेय, यावर यशापयश अवलंबून असल्याचे राजकीय सुञाकडून सांगितले जात आहे.

भिवंडी आणि पालघर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे मतदान 29 एप्रिलला होत आहे. भिवंडी व पालघर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून पुन्हा कपील पाटील आणि राजेंद्र गावित या विद्यमान खासदारांना संधी देवून निवडणूकीच्या रिंगणात उतरविण्यात आले. तर महाआघाडीकडून सुरेश टावरे आणि बविआचे बळीराम जाधव या माजी खासदारांना रिंगणात उतरविण्यात आले आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget