आठवले म्हणतात, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील ही काळ्या दगडावरची रेष

Related image

भोपाळ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मागील पाच वर्षांत कष्टकरी गरिबांसाठी, मध्यमवर्गीयांसाठी चांगले काम केले आहे. दहशतवाद नक्षलवाद संपविण्यासाठी केलेले काम अजोड असून जनता पुन्हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएलाच विजयी करील. देशात पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी होतील ही काळ्या दगडावरची रेष आहे,असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

भोपाळ येथे रिपाइंच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आठवलेंनी हा दावा केला. मध्यप्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण ४० जागा आहेत. त्यात रिपब्लिकन पक्षाने एकूण 5 उमेदवार स्वबळावर उभे केले असून अन्य 35 जागांवर भाजपला पाठिंबा देण्यात आला असल्याची माहिती आठवलेंनी दिली. यावेळी रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस मोहनलाल पाटील उपस्थित होते.

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget