समुद्रात “फटाके’ फुटल्यास आम्ही जबाबदार नाही:आ.नितेश राणेदेवगड : निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्या परराज्यातील बोटीवर कारवाई केली.मात्र मतदानानंतर ही कारवाई आता शांत झाली आहे.त्यामुळे मत्स्य विभाग आणि पोलिसांनी या कडे लक्ष द्यावे अन्यथा समुद्रात फटाके फुटल्यास आम्ही जबाबदार नाही असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते तथा आमदार नितेश राणे यांनी आज येथे दिला आहे.

देवगड किनारपट्टीवर गेले दोन दिवस परराज्यातील नौकांकडून बेकायदेशीररित्या मच्छीमारी सुरू आहे. ते म्हणाले निवडणुका तोंडासमोर ठेवून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कारवाईचा फार्स केला होता.मात्र निवडणुका झाल्यावर कारवाई झालेली नाही.पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक सगळे गप्प आहेत.त्यामुळे काल आपण मत्स्य अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली व ही बेकायदा मच्छीमारी रोखा अशा सूचना दिल्या आहेत.त्यामुळे तात्काळ यंत्रणेने योग्य ती दखल घेऊन संबंधित परराज्यातील मच्छीमारांवर कारवाई करावी अन्यथा आम्ही समुद्रात फटाके फोडू असा इशारा श्री.राणे यांनी दिला आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget