करकरेंचे सहकारी निवृत्त एसीपी साध्वीविरोधात रिंगणात?नवी दिल्ली :  मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांची प्रतिमा कथित रुपात मलीन झाल्याच्या कारणावरून व्यथित झालेले करकरे यांचे माजी सहकारी निवृत्त एसीपी रियाझ देशमुख यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा पराभव करण्याचा विडा उचलला आहे. 

रियाझ देशमुख यांनी भोपाळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून ते साध्वी प्रज्ञासिंह ठाकून यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.

भोपाळच्या जागेसाठी १२ मे या दिवशी ५ व्या टप्प्यातील मतदान होत आहे.

कोण आहेत रियाझ देशमुख

रियाझ देशमुख सन २०१६ मध्ये अमरावतीमधून एसीपी या पदावर असताना निवृत्त झाले. गेल्या ३ वर्षांपासून ते अमरावतीत राहात आहेत. त्यांनी ३ दशकाहून अधिक काळ पोलीस दलात सेवा दिली आहे. निवृत्त झाले तेव्हा ते अमरावतीच्या गुन्हे शाखेचे प्रमुख होते. तत्पूर्वी ते अमरावतीतच गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक होते.

१९८८ मध्ये करकरे अकोल्यात पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. त्या वेळी देशमुख वाशिम पोलीस स्टेशनचे प्रमुख होते. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात करकरे शहीद झाले. तो पर्यंत देशमुख करकरेंच्या संपर्कात होते.

साध्वी प्रज्ञासिंह यांनी जेव्हा भोपाळमधून उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हाच आपण साध्वीविरोधात निवडणूक लढायची, असा निर्णय घेतल्याचे रियाझ देखमुख यांनी सांगितले. 

मुंबई पोलिसातील सर्वात उत्तम आणि प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची बदनामी होताना आपण पाहू शकत नसल्याचे ते म्हणाले. करकरे यांनी नेहमीच मला चांगले मार्गदर्शन केले आहे. ते नेहमीच माझ्या बाजूने उभे राहिले आहेत, असेही देशमुख म्हणाले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget