आम्ही दक्षिणेत योग्य इंजेक्शन दिले आता तुम्ही द्या -आमदार संग्राम जगताप.त्यांची दादागिरी संपवण्याची संधी दवडू नका ...जोर्वे येथे आमदार कांबळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

संगमनेर (प्रतिनिधी) काँग्रेसकडून सत्तेची अनेक पदे ज्यांनी सांभाळली. अनेक वेळा स्वकीयांना त्रास दिला. सहकाराच्या माध्यमातून सगळीकडे हुकुमशाही राबवली. त्यांची दादागिरी संपवण्याची ही योग्य वेळ असून आम्ही दक्षिणेत योग्य इंजेक्शन दिले आता तुम्ही उत्तर देते द्या असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेआहे .

जोर्वे येथे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते .यावेळी सुरेश थोरात शिवाजीराव दिघे .सौ . शांताबाई खैरे .विठ्ठलराव काकड ,संपतराव थोरात ,यांच्यासह गावातील विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते

यावेळी संग्राम जगताप म्हणाले की गेली अनेक वर्ष काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सातत्याने सत्तेत राहून त्या परिवाराने अनेक पदे भोगली आहेत. पण निष्ठा त्यांनी कधी दाखवली नाही .वेळ आली तशी पाठ फिरवली आहे. यावेळेस दक्षिणेत त्यांना त्यांची जागा मतदारांनी दाखवली आहे. आताही उत्तरेतील जनतेला संधी आहे .या घराण्याची दादागिरी हुकूमशाही कायमची संपवा. काँग्रेस पक्षाने कायम सर्वांना घेत विकासाचे राजकारण केले आहे. मात्र याला हे घराणे अपवाद ठरले आहे .यांनी पक्षाचे नाव वापरून स्वतःचा पक्ष तयार केला आहे. जिल्ह्यातून यांना कायमचे हद्दपार करायचे आहे. येत्या निवडणुकीत आमदार भाऊसाहेब कांबळे सारखा गरीब माणूस काँग्रेस पक्षाने उमेदवार दिला आहे .साधा व सरळ माणूस आहे. यांना साधी माणसं व प्रामाणिक माणसे चालत नाहीत. विखे कुटुंब ची हाजीहाजी करणारेच लागतात. म्हणून आमदार कांबळे यांच्या विरुद्ध उभे ठाकले आहेत. पक्षनिष्ठा जर यांची असती तर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असता. परंतु आजही दोन्ही दगडांवर पाय ठेवून आहे .त्यांना अजिबात थारा देऊ नका. आमदार काबळे मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार असून दक्षिणेत व उत्तरेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विजयी होणार आहे. यामुळे या घराण्याचा पराभव नक्की असून हीच संधी चालून आली आहे. आपण सर्वांनी मिळून त्यांचा पराभव करु या असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सुरेश थोरात म्हणाले की अनेक वर्ष स्वतःच्या पक्षातील नेत्यांना यांनी त्रास दिला आहे. सातत्याने विकास कामात खोडा घातला आहे .काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध आपले काही समर्थक यांनी वेगळ्या पक्षात उभे केले. त्यांना ताकद दिली. आता हे उघडे पडले आहेत .त्यांना पराभूत करण्यासाठी आपण सर्वांनी एकमताने आमदार भाऊसाहेब कांबळे यांना पाठिंबा द्यावा असे आवाहनही त्यांनी केले यावेळी विविध कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली या बैठकीसाठी जोर्वे व पंचक्रोशीतील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget