सभेसाठी अशोक चव्हाणांनी भाड्याने नेता आणला



मुंबई : ‘मी सभेला भाड्यानं मंच आणतो, खुर्च्या आणतो. मात्र काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची इतकी वाईट अवस्था झाली आहे की त्यांना प्रचारासाठी भाड्याने पक्ष आणि भाड्याचा नेता आणायला लागत आहे’ असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. शनिवारी दुपारी नांदेड येथील जाहिर सभेत ते बोलत होते. सभेची सुरूवातच फडणवीस यांनी राज यांच्यावर तोफ डागत केली.


राष्ट्रवादी-काँग्रेसच्या प्रचारासाठी राज यांचा महाराष्ट्र दौरा सुरू असून शुक्रवारी त्यांची नांदेड येथे पहिली सभा झाली. काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्यासाठी त्यांनी ही घेतलेली सभा पाहता मुख्यमंत्र्यांनी चव्हाण आणि राज या दोघांवर टीका केली. सध्याच्या मनसेच्या राजकीय परिस्थितवर भाष्य करत फडणवीस यांनी खिल्ली उडवली.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget