मोदींविरोधात ‘त्या’ बडतर्फ जवानाला सपाचे तिकीट



नवी दिल्ली : जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट जेवणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याने बडतर्फ करण्यात आलेला सीमा सुरक्षा दलाचा जवान तेज बहादूर यादव याला समाजवादी पक्षाने वाराणसीतून उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवीत आहेत. यापूर्वी वाराणसीतून समाजवादी पक्षाने शालिनी यादव यांना उमेदवारी जाहीर केली होती. ती रद्द करण्यात आली आहे.

२०१७ साली तेज बहादूर यादव यांनी जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट भोजनाचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. जवानांना मिळणाऱ्या आहाराच्या दर्जाबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याच वर्षी त्यांना सीमा सुरक्षा दलाच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget