मोदीजी, तुम्ही आमच्या राष्ट्रवादाला घाबरता ?

 राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवाद काढता परंतु मोदीजी याच राष्ट्रवादाला तर तुम्ही घाबरत आहात अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. मोदी यांनी नगरच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवाद एक निव्वळ दिखावा आहे असे म्हटले होते. मोदींच्या या वक्तव्याचा नवाब मलिक यांनी खरपूस समाचार घेतला.

नवाब मलिक म्हणाले की, तुमचा राष्ट्रवाद हा हेडगेवार, गोळवळकर गुरुजींचा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे. यामध्ये एका विशेष वर्गाला, विशेष जातीच्या लोकांना स्थान आहे. इतर लोकांना स्थान नाही असे सांगतानाच आमचा राष्ट्रवाद हा शाहू फुले आंबेडकर, महात्मा गांधी, मौलाना आझाद यांचा राष्ट्रवाद आहे अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget