जवानांच्या नावावर मतं मागताना लाज नाही वाटत?नांदेड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी-शाहांविरोधात रणशिंग फुंकलंय. यासाठी एकही उमेदवार उभा न करता ते राज्यभर सभा घेत आहेत. यातील पहिली सभा नांदेडमध्ये झाली. 

या देशातून मोदी आणि शाह हे नाव घालवणं गरजेचं आहे, असं म्हणत भाजपच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. मोदी जाईन तिथे सभा घेतात, पण कधी मराठवाड्यातील शेतकऱ्यांबाबत, तरुणांबाबत बोलले का, असा सवालही राज ठाकरेंनी केला.

पुलवामा हल्ल्यावरुन राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. पुलवामातील शहीद जवानांच्या नावे मतं मागतायेत, ते काय निवडणुकीला उभे आहेत का? अभिनंदन निवडणुकीला उभा आहे का? योगी आदित्यनाथ म्हणाले देशाची सेना ही म्हणे मोदींची सेना आहे. मोदींनी नव-मतदारांना आवाहन केलं की तुमचं पहिलं मत हे बालाकोटचा एअरस्ट्राईक करणाऱ्या सैन्यासाठी, पुलवामाच्या वीर शहिदांसाठी द्या. जवानांच्या नावावर मतं मागताना लाज नाही वाटत?, असंही राज ठाकरे म्हणाले.

बालाकोट हवाई हल्ल्यात शत्रू राष्ट्राचे किती सैनिक मारले गेले याचा आकडा हवाई दलाच्या प्रमुखांकडेही नाही. पण अमित शाह म्हणाले 250 दहशतवादी मारली गेली. अमित शाहांना कुठून मिळाला हा आकडा? मोदींनी युद्धसदृश्य स्थिती निर्माण केली, आमच्या देशाच्या सैन्यांवर आमचा विश्वास आहे. मी 4 वर्षांपूर्वी बोललो होतो की निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील. ते आज खरं ठरतंय, असं म्हणत त्यांनी मोदींवर गंभीर आरोप केला.
Labels:

Post a Comment

नूसत्या सभा घेऊन काय ऊपयोग,राज यांचं देशाासाठी काही योगदान अाहेकाा? कााय केलँ देशाासाठी, शेतकरी वर्गाासाठी, जो पक्ष निवडणूक लढवू शकत नाही त्याांनी मोदिंना नावे ठेऊ नये असं मला वाटतं .झााड लावल्याावरलगेच फळ येत नाही

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget