गँगस्टर अरुण गवळीच्या पक्षाचा महायुतीला पाठिंबा

गँगस्टर अरुण गवळीच्या पक्षाचा महायुतीला पाठिंबा

मुंबई : लोकसभा निवडणुका आता शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या 29 एप्रिलला होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यातच दक्षिण मुंबईच्या राजकारणात आता गँगस्टर अरुण गवळीच्या पक्षाचं नाव जोडलं गेल्याने तिथल्या निवडणुकीची रंगत वाढली आहे. अरुण गवळीच्या ‘अखिल भारतीय सेना’ या पक्षाने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीला जाहीर पाठिंबा दिला आहे.

दक्षिण मुंबईचे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांना अखिल भारतीय सेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. यासंदर्भात अरुण गवळी यांच्या पत्नी आशा गवळी, मुलगी गीता गवळी आणि विजय अहीर यांच्याशी काहीच वेळापूर्वी महायुतीचे कोकण समन्वयक आमदार प्रसाद लाड, शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर आणि बीएमसी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. यावेळी गीता गवळी यांनी त्यांचा पक्ष हा महायुतीला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget