बारामती मतदार संघात सर्वाधिक चार महिला उमेदवार रिंगणात !



मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 14 मतदार संघामध्ये मतदान होणार असून 249 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या टप्प्यात 2 कोटी 57 लाख 89 हजार 738 मतदार मतदानाचा पवित्र हक्क बजावणार आहेत. तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.
तिसऱ्या टप्प्यात 249 उमेदवारांमध्ये 19 महिला उमेदवार असून बारामती मतदार संघात सर्वाधिक चार महिला उमेदवार आहेत. तर पुणे व माढा मतदारसंघात सर्वाधिक प्रत्येकी 31 उमेदवार असून सर्वात कमी 09 उमेदवार हे सातारा मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे आहेत. याशिवाय जळगाव (14), रावेर (12), जालना (20), औरंगाबाद (23),रायगड (16), बारामती (18), अहमदनगर (19), सांगली (12), रत्नागिरी-सिंधुदुर्ग (12), कोल्हापूर (15) व हातकणंगले (17) उमेदवार निवडणूक लढवित आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

या टप्प्यासाठी 56 हजार 025 बॅलेट युनिट तर 35 हजार 562 कंट्रोल युनिट देण्यात आली आहेत. तसेच 37 हजार 524 व्हीव्हीपॅट यंत्रे सुद्धा या चौदा मतदार संघात देण्यात आली आहेत. या टप्यातील प्रक्रियेसाठी एकूण 1 लाख 41 हजार 113 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, 17 हजार 192 कर्मचाऱ्यांना राखीव म्हणून ठेवण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात या मतदारसंघात एकूण 1 कोटी 33 लाख 19 हजार 10 पुरुष तर 1 कोटी 24 लाख 70 हजार 76 महिला आणि 652 इतर नागरिक मतदान करणार आहेत.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रात सखी मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 10 टक्के मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार असून जिल्हा निवडणूक अधिकारी, राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी आणि भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी, संबंधित मतदार संघांचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक हे लाइव्ह वेबकास्ट पाहतील.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget