प्रियंका गांधींचा ४१ मतदारसंघाच्या जवाबदारीमुळे निवडणूक लढण्यास नकार


Image result for प्रियंका गांधी

नवी दिल्ली : काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसी येथून लोकसभा निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात होती. प्रियंका गांधी यांनी स्पष्ट केले की, माझ्या खांद्यावर संपूर्ण उत्तर प्रदेशमधील प्रचाराची जबाबदारी आहे. ४१ मतदारसंघात पक्षाला विजयी करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे एका ठिकाणी राहून मला हे शक्य होणार नाही, असे प्रियंका गांधी यांनी स्पष्ट केले आहे.

प्रियंका गांधी २८ मार्च रोजी रायबरेलीमध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रचारासाठी गेल्या होत्या. कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याची विनंती त्यांना केली होती. त्यावेळी निवडणूक लढवायची तर मी वाराणसी येथून लढवू का असा प्रतिप्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांना विचारला होता. ही चर्चा अनौपचारिक स्वरूपाची होती. मात्र त्यानंतर प्रियंका गांधी या खरोखरच वाराणसी येथून निवडणूक लढवणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. तसेच प्रियंकांनी वाराणसी येथून निवडणूक लढवल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मोठे आव्हान उभे राहील, अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget