आता नारायण राणे काय गौप्यस्फोट करणार ?


आता नारायण राणे काय गौप्यस्फोट करणार, याची उत्सुकता निर्माण झाले आहे.कारण नारायण राणे आता आत्मचरित्र लिहित आहेत.

आमदार नितेश राणे यांनी बुधवारी दुपारी ट्विट केले. या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतात, माझे मार्गदर्शक आणि वडील नारायण राणे यांचे आत्मचरीत्र येणार असून अब आएगा मजा, सबका हिसाब होगा.

भाजपाच्या पाठिंब्यावर राणे राज्यसभेत गेले आहेत. आता नारायण राणे यांच्या आत्मचरीत्रात नेमका काय उल्लेख असेल, शिवसेनेबाबत ते आत्मचरीत्रात काय लिहिणार, आत्मचरीत्रात मोठ्या नेत्यांबाबत काही गौप्यस्फोट करणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

अब आयेगा मजा, सबका हिसाब होगा अशा शब्दांमध्ये त्यांचे पुत्र नितेश राणे यांनीच आत्मचरीत्राचं वर्णन केलं असल्यामुळे आणि नारायण राणे यांचा आक्रमक स्वभाव लक्षात घेता ते अनेक मोठ्या लोकांची पोलखोल करतील असा अंदाज व्यक्त होत आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget