सुशीलकुमार शिंदें घेणार राजकीय संन्यास



सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तसंच केंद्रीय गृहमंत्रीपद आणि राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या सुशीलकुमार शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. 


2019 ची लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय निवृत्ती घेणार असल्याचं सुशीलकुमार शिंदेंनी जाहीर केलं आहे. काल दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराची मुदत संपण्यापूर्वी सुशीलकुमार शिंदेंनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या राजकीय संन्यासाचा मुहूर्त जाहीर केला आहे.

2019 ची ही लोकसभा निवडणूक ही माझी शेवटची निवडणूक असेल, यानंतर मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. दरम्यान यावेळी सुशीलकुमार शिंदेंनी प्रकाश आंबेडकर आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget