निवडणूक मध्ये आवश्यक असलेली स्वयंसंहितामित्रांनो, सध्या देशभरात निवडणूकीचे वारे चालू आहेत, या पार्शवभूमीवर बऱ्याच मित्रांच्या आग्रहाखातर हा लेख लिहीत आहे. मुद्दामून हा 'जीवनरहस्य' नावाने लिहीत आहे कारण, लोकशाही ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि निवडणुका ह्या लोकशाहीचा भाग आहे. निवडणूक मध्ये पाळावायाची स्वयंसंहिता :-

1. मतदान करताना कधीही भावनिक मुद्यावर करू नये, तर ते विकास धोरणवर करावेत. उदा : जात -धर्म सारखे भावनिक मुद्दे, मोठ्या राजकीय नेत्यांचे नाव वापरून पुढील पिढीचे राजकारण,चित्रपट वगैरे (कारण चित्रपटात फक्त चांगली बाजूच दाखवली जाते ).
2.निवडणुकी मध्ये कधीही उमेदवारकडून पैसे स्वीकारू नयेत, कारण पुढे निवडून आल्यानंतर तो उमेदवार प्रामाणिकपणे काम करेल याची शास्वती नसते. तसेच पैसे घेणाऱ्या मतदाराला लोकप्रतिनिधीकडुन हक्कानी काम करुन घेता येत नाही. शिवाजी महाराज , शाहू -फुले, आंबेडकर, अहिल्या होळकर यांचे आपण जर स्वतःला वारस समजत असू,तर आपले मत (स्वाभिमान ) एवढे स्वस्त कसे होईल.
3. पक्षबरोबर लोकप्रतिनिधीचे कर्तृत्व पाहणे आवश्यक आहे. कारण, तुमची कामे दिल्लीत नाहीतर गल्लीत होतात, तुमच्या समस्या दिल्लीपर्यंत नेणारा हवा. नुसता उमेदवार उच्च शिक्षित आहे म्हणून पाहू नका, तर त्याचा जनसंपर्क व जनतेत आजपर्यंत करत असलेले कामे सुध्दा पहा.
4.एखाद्या बड्या नेत्याचा नातेवाईक उमेदवार म्हणून उभा असताना घ्याववयाची काळजी. तो जर इतर उमेदवारांपेक्षा सक्षम व प्रभावीपणे जनतेचे प्रश्न सोडवणारा असेल, तरच त्याला मतदान करा, त्याच्या बॅकग्राऊंडला पाहून नको.
5. उमेदवार हा श्रीमंत आहे का गरीब ह्या बाबींवर पाहून मतदान करू नका. कारण, लोकप्रतिनिधी हे आपले विकासाची कामे सरकारच्याच तिजोरीतून करत असतात, स्वतःच्या खिश्यातून नव्हे.
6. देशात 64% तरुण आहेत, त्यामुळे ते देशातील सत्ताबाबत निर्णायक भूमिका ठरु शकते. त्यामुळे त्यांनी मतदान करताना घरचे व गावचे स्थानिक राजकारण, दहीहंडी -गणपतीच्या काळात मिळणारी वर्गणी ह्या सारख्या भावनिक व धार्मिक मुद्द्यावर मतदान करू नये, कारण याने कायमस्वरूपीचा तुमचा विकास होत नाही. मतदान करताना रोजगार व आपल्या गावातील पायाभूत सुविधा ह्या बाबींचा विचार करुन मतदान करावे.
7. साक्षर तरुणांनी राजकारणाचा द्वेष न करता हॉलिडे म्हणून मतदानवर बहिष्कार टाकू नये ;कारण त्यांनाच खरी योग्यतेची जाणीव असते. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून योग्य लोकप्रतिनिधी संसदेत पाठवले जाऊ शकतात. व ते वेळोवेळी लोकप्रतिनिधी ला हक्काने जाब विचारू शकतात.
8. मित्र, नातेवाईक यांच्या दबावाखाली न येता मतदान करताना निवडणूक आयोगाने चालू केलेल्या NETA अँप चा वापर करू शकता. की ज्यामुळे तुम्हाला उमेदवार निवडणताना सोपे जाईल.
9. MMM कॅपिटल म्हणजे man, money, material ह्यावर मतदान न करता विकासाच्या मुद्देवर मतदान करावे.
10. निवडणुकीत पैसे मिळतात किंवा रोजगार उपलब्ध होतो, म्हणून प्रचार करताना मतदारांवर नैतिक दडपण आणू नये कारण त्याच्या भवितव्यशी तडजोड केल्यासारखे होईल.
11. ज्याप्रमाणे मुलीचा बाप जावई पाहत असताना मुलाला मुलाला एकदम पारखून पाहत असतो, त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधीला ही पहा. कारण जावई हा एका मुलीच्या भवितव्याशी संबंधित आहे, तर लोकप्रतिनिधी हा लाखो लोकांच्या भवितव्याशी संबधीत आहे.
मित्रांनो, हे माझे वयक्तिक मत आहे ;कुणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश अजिबात नाही. मत आवडले तर मत नक्की share करा. आणि सर्वजण मिळून एक नारा देऊयात..
जागो मतदार जागो, अपने हर एक हक्क को मांगो
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget