शिवश्री सौरभदादा खेडेकर : भविष्याचा वेध घेणारे कणखर नेतृत्व

संंभाजी ब्रिगेडचे महासचिव शिवश्री सौरभदादा खेडेकर यांचा आज वाढदिवस.सर्वप्रथम त्यांना माझ्या जिल्ह्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो.सौरभदादा खेडेकर आज ब्रिगेडचे महासचिव जरी असले तरी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच मी त्यांच्याकडे पाहतो.कारण त्यांनी आपण महासचिव वगैरे आहोत असे आपल्या वर्तनातून कधीच जाणवू दिले नाही. बालपणापासूनच सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधे सहज मिसळणारा,मनमोकळे बोलणारा,प्रश्न समजून घेणारा व ते तातडीने मार्गी लावणारा एक कुशल संघटक त्यांच्यामधे दिसून येतो.आई वडिलांचा वारसा जरी त्यांना लाभला असला तरी त्यांनी कधीही या गोष्टीचा अहंकार बाळगला नाही व आपण काहीतरी वेगळे आहोत हे कधीच दाखविले नाही.स्वतःंच्या व्यक्तिमत्त्वाला त्यांनी स्वतःच विकसीत केले व त्या माध्यमातून आज संभाजी ब्रिगेडच्या वाढीसाठी अहोराञ मेहनत घेत आहे.
प्रदेशाध्यक्ष मा.मनोजदादा आखरे यांच्यासोबत त्यांचा अतिशय चांगला समन्वय असून ही अतूट जोडी आज संभाजी ब्रिगेडचा कारभार व्यवस्थितपणे सांभाळत आहे.सौरभदादांनी १००% समाजकारण व १०० % राजकारण हे ध्येय ठरवून आज महाराष्ट्राच्या राजकारणात सामान्य कार्यकर्त्यांसाठी एक नवीन पर्याय उभा केला आहे.त्यामुळे समाजकारणातून राजकारण व राजकारणातून समाजकारण हे नवीन समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळत आहे.सौरभदादांचा जन्मच मराठा सेवा संघाच्या चळवळीत झाला.लहानपणापासूनच सेवा संघाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,विचारवंत लेखक यांचा त्यांच्या घरी मुक्त वावर असल्यामुळे त्यांना चहा,पाणी,नाश्ता,जेवण देणे,घरी आलेल्या लोकांची आवभगत करणे ही सर्व कामे सौरभदादांनाच करावी लागत असे.त्यामुळे सेवा संघाची चळवळ त्यांच्या नसानसात भिनली आहे.त्यांच्या समोरच सर्व महत्वाच्या घडामोडी,निर्णय सुरुवातीच्या काळात होत असल्यामुळे त्यांना कुठे,काय, केव्हा व का करायला पाहीजे हे सर्व माहीत आहे.त्यामुळे सौरभदादांना अनुभव नाही हे म्हणणे चूक आहे.आपल्या वडिलांसोबत लहानपणापासून त्यांनी कित्येकदा संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला आहे.सामान्य कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम केलेला आहे.त्यामुळे सर्व चांगले वाईट अनुभव त्यांनी घेतलेले आहे.तसेच १५ वर्षापासून मा.खेडेकर साहेब सेवा संघाच्या कोणत्याच पदावर नाही.फक्त मार्गदर्शकाची भूमिका ते निभावतात.बाकी सर्व कारभार पदाधिकारीच पाहतात.त्यामुळे ज्या माणसाने अहोराञ मेहनत करुन ही ऐतिहासिक चळवळ उभी केली,त्या व्यक्तीच्या घरातील एखादी व्यक्ती संघटनेत एखादे महत्वाचे स्थान भूषवित असेल तर त्यात काही वावगे वाटून घेण्याचे कारण नाही.
खेडेकर कुटुंबाचा त्याग खूप मोठा आहे. महाराष्ट्रातील मराठा बहुजन समाजाला त्यांनी आपल्या अस्मितेची व इतिहासाची जाणीव करुन दिली आहे.प्रत्येक व्यक्तीत काही दोष असतातच.जगातील कोणतीच व्यक्ती १०० % परिपूर्ण नाही.त्यामुळे ज्या माणसाने ९९ % कामे समाजहिताची केली त्याच्या १ टक्के दोषावर चर्चा करण्याची गरज नसते.म्हणूनच आज मा.खेडेकर साहेबांच्या रुपात आपण सौरभदादांकडे पाहिले पाहीजे.त्यांच्याकडे अनेक चांगल्या गुणांचा संग्रह आहे.नेतृत्व,कर्तृत्व,वक्तृत्व,संघटन,नियोजन,नवीन कल्पना,जगातील घडामोडींची माहिती,राजकारण व समाजकारणाचे भान व जाण आणि भविष्याचा वेध घेण्याची क्षमता या सर्व गुणांनी परिपक्व असलेले समाजशील व्यक्तिमत्त्व म्हणजे सौरभदादा खेडेकर होय.भविष्यात सौरभदादा महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात निश्चितच मोठी उलथापालथ घडवून आणेल यात यत्किंचितही शंका नाही.जिजाऊ त्यांना हे शिवधनुष्य पेलण्याकरीता शक्ती,युक्ती व आरोग्य प्रदान करो हीच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने मनोकामना व्यक्त करुन त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो.
-सोमनाथ नवले (प्रदेश मुख्य समानव्यक -संभाजी ब्रिगेड )
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget