पराभव दिसत असल्यामुळे केसरकर आले रडकुंडीला!



कणकवली : विरोधकांकडून कितीही बागुलबुवा झाला तरी लोकसभा निवडणुकीत डॉ.निलेश राणे यांचाच विजय होणार आहे.विजयाचे फटाके आम्हीच फोडणार आहोत,असा दावा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज येथे केला.

ते म्हणाले, ६० टक्के पेक्षा जास्त मतदान होणे हे प्रस्थापितांना धोक्याचे होते.गेल्या पाच वर्षात त्यांनी विनायक राऊत यांच्याकडून कोणतेही सकारात्मक किंवा विकासाचे काम झाले नाही.त्यामुळे २३ मे रोजी जाहिर होणारा निकाल हा आमच्याच बाजूने असणार आहे.विजयाचे फटाके आम्हीच फोडणार आहोत.

ते म्हणाले,दहशतवादाचा बागुलबुवा करणारे आमचे विरोधक आता रडकुंडीला आलेले आहेत.बालिश वक्तव्ये करताहेत,चिडचिड झाली आहे.कधीही न चिडणारे दिपक केसरकर यांच्या वक्तव्यावरून पराभव त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे २३ मे रोजी फटाके आम्हीच फोडणार असा दावा त्यांनी केला.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget