पालघरमध्ये आगरी सेनेचा शिवसेनेला दणका
पालघर : पालघरमध्ये दोनच दिवसात म्हणजे 29 एप्रिलला मतदान पार पडणार आहे. काँग्रेसमधून भाजपममध्ये आणि भाजपमधून शिवसेनेत दाखल झालेले राजेंद्र गावित हे महायुतीचे उमेदवार असून, विरोधात बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव उभे ठाकले आहेत.

दोन दिवसांवर मतदान असतानाच, शिवसेनेला पालघरमध्ये मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेला फायदेशीर ठरणाऱ्या आगरी सेनेत उभी फूट पडली आहे. आगरी सेनेचे पालघर तालुकाध्यक्ष अनिल पाटील यांनी बंडखोरी करत, बविआचे उमेदवार बळीराम जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे पालघरमधील निवडणुकीला आता रंगत आली आहे.

पालघर तालुका आगरी सेनेतर्फे केळवे येथे मार्गदर्शन शिबराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालघर तालुका अध्यक्ष अनिल पाटील यांनी शिवसेनेला पाठिंबा न देता बंडखोरी करत महाआघाडी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना आपला पाठिंबा जाहीर केला. शिवसेनेला याचा अनपेक्षित फटका बसणार आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget