अकोल्यातल्या माणसाचं सोलापुरात काय काम? : प्रणिती शिंदे



सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. यात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेही मागे राहिल्या नाहीत. 

यावेळी प्रणिती शिंदेंनी थेट वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि सोलापुरातील उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यावरच घणाघात केला आहे.

“दुसरे तिसरे कोण ते, अकोल्यावरून आलेत. अकोल्यावरुन आलेल्या माणसाचं आपल्या येथे काय काम? तो येऊन आपल्याला शिकवेल, असं कर तसं कर?” असे म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे. 

तसेच, “भाजपची बी टीम असलेल्या वंचित बहुजन आघाडीला फक्त सांगितलं गेलंय की, सोलापूरला जा आणि लावा, पेटवा.. बस्स. आणि आपण त्यांच्या मागे जाणार.” असा आरोपही प्रणिती शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर केली.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget