स्मृती इराणी यांची डोकेदुखी वाढली ,ही विश्वासू व्यक्ती भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये



अमेठी : भाजपने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीत विजयासाठी रणनीती आखली आहे. पण त्याअगोदरच भाजपला धक्का लागलाय. अमेठीच्या भाजप उमेदवार स्मृती इराणी यांच्या सर्वात विश्वासू व्यक्तीने भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.

 काँग्रेसच्या प्रभारी प्रियांका गांधींनी भाजपचा महत्त्वाचा नेता फोडण्यात यश मिळवलंय. उत्तर प्रदेशची जबाबदारी सध्या प्रियांका गांधी सांभाळत आहेत.

रवी दत्त मिश्रा हे अमेठी मतदारसंघात स्मृती इराणींचे सर्वात विश्वासू सहकारी मानले जायचे. पण त्यांनी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतलाय. स्मृती इराणींचा अमेठी दौरा आणि रवी दत्त मिश्रा यांची साथ हे समीकरण असायचं. रवी दत्त मिश्रा यांनीच स्मृती इराणींना अमेठीत आणल्याचं बोललं जातं. रवी दत्त यापूर्वी समाजवादी पक्षाचं सरकार असतानाही मंत्रीही राहिलेले आहेत.

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget