‘बोलव रे त्यांना’, मनसेकडून भाजपच्या खोट्या जाहिरातीची पुन्हा पोलखोल!

Image result for मनसे

मुंबई : ‘बोलव रे त्यांना’ करत मनसेकडून भाजपच्या खोट्या जाहिरातीची पुन्हा पोलखोल करण्यात आली आहे. कौशल्य इंडियाच्या माध्यमातून भाजप सरकारने रेखा वाहटूळे नावाच्या महिलेला भाजप योजनांचे लाभार्थी दर्शवणारी जाहिरात केली. मात्र आपण भाजप योजनांचे लाभार्थी नसल्याचा दावा करणारया या महिलेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शनिवारी मनसेद्वारे राजगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलावले आणि भाजपच्या खोट्या जाहिरातीची चिरफाड केली.

यावेळी देशपांडे यांनी वाहटूळे यांची वृत्तपत्रात आलेली जाहिरात दाखवली. औरंगाबादमधील रेखा वाहटूळे या त्यांचा स्वत:चा मसाल्याचा व्यवसाय चालवतात. मला जेव्हा कौशल्य विकास योजनेबद्दल कळलं तेव्हा मी या योजने अंतर्गत प्रशिक्षण घेतले. या योजने अंतर्गत २० ते ३० टक्के सबसिडी मिळते, कर्ज उपलब्ध व्हायला मदत केली जाते असे सांगण्यात आले. तसेच व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही देण्यात आले. मात्र या योजनेचा आपल्याला कोणताच फायदा झाला नसल्याचे वाहटूळे यावेळी म्हणाल्या.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget