पवार आमचा परिवार एक आहे असं सांगतात मात्र माझ्या भावाला शिकवत नाहीतअहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काही ठराविक कुटुंब चर्चेत आहेत. यामध्ये एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं कुटुंब. पवार हे कुटुंबात धुसफूस असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आणि त्यानंतर राजकीय वातावरण तापलं. आमच्या कुटुंबात सगळं काही आलबेल असल्याचं पवार म्हणाले. पवार एकत्रित कुटुंबाबाबत चागलं सांगतात, पण ते माझ्या भावाला शिकवत नाहीत, असा टोला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी लगावला.

अहमदनगरचे भाजप उमेदवार सुजय विखे यांच्यासाठी पंकजा मुंडे यांची जिल्ह्यातील शेवगावमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. तर दोन धर्मातलं ऐक्य पाहून काँग्रेसच्या पोटात दुखतं, तसेच दोन जातींमधील सलोख्याने राष्ट्रवादीच्या पोटात दुखतं, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली.

राजकारणात नातीगोती असतात आणि ती सांभाळली पाहिजेत, असं मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं. पवार आमचा परिवार एक आहे असं सांगतात. मात्र माझ्या भावाला शिकवत नाहीत, असा टोला त्यांनी लगावल. तिकडे बहीण-भाऊ सोबत सेल्फी काढतात, पण इकडे पंकजाची पात्रता नाही, प्रितमची पात्रता नाही असं म्हणून त्यांनी आम्हाला संपवायचा विडाच उचललाय, असं पंकजा म्हणाल्या.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget