सुप्रिया सुळेंना धक्का, राष्ट्रवादीच्या निरीक्षकाचाच भाजपात प्रवेश



बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे सध्या गावोगाव जाऊन प्रचार करत आहेत. या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या निरीक्षकानेच भाजपात प्रवेश केलाय. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती सुप्यात झालेल्या सभेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर बारामतीच्या निरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

राहुल शेवाळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळख होती. पुणे जिल्ह्यातील युवक संघटनाची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने जिल्ह्यात तरुणांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे. शिवाय ते पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातूनही इच्छुक होते. पण त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपचा झेंडा हाती घेतलाय.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget