अजित पवार मावळमध्ये तळ ठोकून

Image result for अजित पवार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची मावळमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण, मुलगा पार्थ पवारला या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासाठी ते मावळमध्ये तळ ठोकून आहेत.

अजित पवारांची भाजपच्या आमदारांशी जवळकी चर्चेचा विषय ठरली आहे. भाजप आमदार बाळा भेगडे यांच्याशी एका कार्यक्रमात त्यांनी केलेली गुफ्तगू चर्चेचा विषय बनली आहे.

मावळ येथील काणे फाटा येथे रवी भेगडे यांनी सामुदायिक सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या सोहळ्याला अजित पवार यांनी हजेरी लावत तेथील स्थानिक आमदार बाळा भेगडे यांच्याशी सात-आठ मिनिटे चर्चा केली. यावेळी युतीचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणेही शेजारीच होते. पण अजित पवार यांनी बारणेंशी बोलणं टाळलं. पण बारणेंना सोडून बाळा भेगडेंशी केलेल्या चर्चेमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget