शमीच्या घरी जाऊन बायकोची राडेबाजी, गोंधळ घालणारी हसीन जहां अटकेत

Image result for हसीन जहां
लखनऊ : टीम इंडियाचा क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने हायव्होल्टेज राडा केला. पत्नी हसीन जहांने शमीच्या घरी जाऊन राडेबाजी केली. हसीन जहां रविवारी रात्री सहसपूर अलीनगर इथे आली. त्यानंतर ती शमीच्या घरी गेली आणि एका खोलीत जाऊन बसली.

शमीच्या नातेवाईकांनी तिला घरातून बाहेर काढलं. त्यावेळी हसीन जहां आणि शमी कुटुंबियांमध्ये वादावादी झाली. त्यावेळी पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी तपास करुन, हसीन जहां आणि अन्य दोघांना अटक केलं. आज तिला कोर्टात हजर करण्यात येत आहे.

हसीन जहां रविवारी अचानक शमीच्या गावी दाखल होत, त्याच्या घरात आली. शमीच्या नातेवाईकांनी तिला घरात घुसण्यास विरोध केला. मात्र तरीही घरात घुसण्यात ती यशस्वी ठरली. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांनी शमीच्या पत्नीला ताब्यात घेतलं.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget