कोतुळला पदस्पर्शभुमी सोहळा संपन्न(मान्हेरे वार्ताहर) अकोले तालुक्यातील कोतुळयेथे पदस्पर्शभुमी सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोतुळचे वतनदार भाऊ दाजी देशमुख यांच्या केस बाबत २७एप्रिल१९४१रोजी बाबासाहेब आंबेडकर हे कोतुळला मुक्कामी आले होते. तेव्हा पासून पदस्पर्श भुमी ह्या नावाने हा कार्यक्रम आयोजित केला जातो.२७एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता झेंडा वंदन सोनबा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या नंतर सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक नंतर जि.प.सदस्य राजेंद्र देशमुख यांच्या वाड्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अभिवादन सभा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे अँड. संघराज रुपवते होते. यात उत्कर्षाताई रुपवते यांनी मार्गदर्शन केले. आजच्या तरुणांच्या हाताला काम मिळाले तरच कार्यकर्ते घडतात. म्हणून आजच्या तरुणांनी उद्योग व्यवसाय सुरू केले पाहिजे असे मत व्यक्त केले. यात तनुजा पवार दिक्षा देठे संभाजी साळवे आदिंची मनोगत व्यक्त करण्यात आली. अध्यक्ष स्थानी बोलताना अँड संघराज रुपवते यांनी हि विचारांची लढाई आहे. शिक्षणाच्या प्रवाहात या असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन पोपट सोनवणे संदिप बर्वे नवनाथ वैराळ दिनकर बर्वे साहिल सोनवणे सुरेश देठे भागाजी खरात सुरेश जगधने गौतम रोकडे आदिंनी केले होते. कार्यक्रमास डि.एम. वाकळे सर वसंत भद्रीके रवींद्र देठे एल.सी.हरनामे हौसाबाई जगधने मच्छिंद्र देशमुख राजेंद्र घायवट शंकर जगधने आदी उपस्थित होते. आभार संदिप बर्वे सर यांनी मानले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget