विचारवेध'महाराष्ट्राचा इतिहास हा शोर्य,पराक्रम,आत्मबलिदान,साहस,अशा कितीतरी उल्लेखनीय गोष्टीनी जगभर गाजला आहे. जेव्हा आपण इतिहास वाचतो तेंव्हा शरीरावरील शहारे अजुनच शहारत जातात.महाराष्ट्र म्हणजे पराक्रमाची खाण,शूरवीरांची जन्मभूमी, साधुसंतांची पावनभूमी, विचारवतांची लेखणी,तलवारीचा खणखणाट आणी तोफगोळ्यांचा आवाज,अरे....कसे वर्णन करावे या महाराष्ट्राचे इथे तर पावलोपावली 'इतिहास निर्माते'भेटतात.ज्या क्षेत्रात जाईल,त्या क्षेत्रात इतिहासाचे सुवर्णपान लिहुन दाखविण्याची क्षमता या महाराष्ट्राने येथील माणसांना दिलीय.ज्या महाराष्ट्राने कधीकाळी दिल्लीचे तख्त ही हादरविले होते तेथे या 'पाकड्यांची'काय मजाल. काय माहित त्या 'नामर्दांना'या भूमीत माणसं नाही तर 'वाघ'राहतात.जेव्हा वाघाची 'दहाड गर्जना'होते,तेव्हा भलेभले आपल्या 'नांग्या'टाकुन शरणागती पत्करतात.येथे जो जन्मतो तो हेच म्हणतो,"मी महाराष्ट्राचा,महाराष्ट्र माझा".


कौतुके महाराष्ट्राची-


गावी कौतुके महाराष्ट्राची
गडे आपुल्या प्रेमळ कंठी
साधू संत महामुनी
झाले जसे वशिष्ठी


गोदावरी,भीमा,कृष्णा
तापी अन नर्मदा
चरण तुझे धुता
भाग्य पावला अरबी समुद्रा


अष्ट गणेशा,पंच ज्योतिर्लिंगा
महाराष्ट्रा तुझ्याच पोटा
शिरे वरी तुझ्या शोभतो
तेज कळसुबाई मुकुटा


थळ,भोर,कुंभार्ली,
आंबा,फोंडा,आंबोली
तिन्ही ऋतुत देतात
तुला मायेची सवली


सातपुडा,सातमाला,बाला
महादेव तुझ्या दुतर्फा
ज्ञाना, तुका,एकनाथ
आहे तुझ्याच गर्भा


झाले किती शूरवीर
साक्षी तू सर्वांचा
म्हणून म्हणतो गावा
गौरव तुझ्या कीर्तीचा


महाराष्ट्र देशा,
माझ्या महाराष्ट्र देशा.


Copyright@


✍🏻...तुषार उत्तमराव दाभाडे.
९९६०९२३३७७

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget