राज ठाकरेंची सीआयडी चौकशी करा, हायकोर्टात याचिका दाखल


मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सीआयडी चौकशी करा, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. पत्रकार एस बालकृष्णन यांनी ही याचिका दाखल केली आहे. राज ठाकरे यांनी राष्ट्रीय सुरक्षेबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

बालकृष्णन यांनी राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्याबाबत केलेल्या वक्तव्याला आक्षेप घेतला आहे. देशात पुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला होऊ शकतो, असं राज ठाकरे विविध सभांमध्ये सांगत आले आहेत. त्यामुळे बालकृष्णन यांनी त्यांचं हे वक्तव्य म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणार असल्याचं म्हटलं आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget