५६ पिढ्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या तरी भगवा फडकणारच


परभणी: परभणीसह मराठवाड्यात शिवसेनाप्रमुखांनी पेरलेल्या बीजांना आता धुमारे फुटले आहेत. परभणी तर भगव्याचा बालेकिल्ला राहिला आहे. विरोधकांना माझे खुले आव्हान आहे. 

५६ पक्षच काय ५६ पिढ्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या तरी हा भगवा फडकणारच, असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी(दि.१४) सायंकाळी येथील स्टेडियम मैदानावर झालेल्या जाहीर सभेत व्यक्त केला. 

सभे दरम्यान उठलेल्या वादळ वाऱ्यामुळे मोठा गोंधळ उडाला. अशाही स्थितीत ठाकरे यांनी थेट २० मिनिटे संवाद साधला. 

युतीचे उमेदवार खा.संजय जाधव यांच्या प्रचारार्थ स्टेेडियम मैदानावर सायंकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, खा.संजय जाधव, आ.डॉ.राहुल पाटील, मिलिंद नार्वेकर, माजी आ.विजय गव्हाणे, माजी आ.हरिभाऊ लहाने, सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, हिकमत उढाण, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, मेघना बोर्डीकर, अभय चाटे आदींची प्रमुख उपस्थित होती.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget