नाशिक येथील रामशेज माध्यमिक विद्यालयात दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाची नियोजन मिटिंग संपन्न
नाशिक ( प्रतिनिधी)बुधवार दिनांक २४ रोजी रामशेज माध्यमिक विद्यालय आशेवाडी ता.दिंडोरी जि. नाशिक येथे ५ जून रोजी होणाऱ्या जीवनगौरव राज्यस्तरीय दुसरे शिक्षक साहित्य संमेलन नियोजन समितीची बैठक घेण्यात आली यावेळी रामशेज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवराम बाबुराव बोडके व सर्व शाखांचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संमेलनाची पूर्व तयारी व नियोजन याबद्दल आढावा घेण्यात आला. यासंदर्भात उपस्थित विविध समितीच्या सदस्यांना कामासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी जीवन गौरव मासिकाचे मुख्य संपादक रामदास वाघमारे , दिगंबर शिंदे पुणे जिल्हा सहसंपादक,व संतोष दातीर रायगड जिल्हा सहसंपादक,वैशाली भामरे मालेगाव, रुपाली बोडके नाशिक आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर मिटिंग चे आयोजन संमेलन स्वागताध्यक्ष व यावर्षी चे आयोजक सौ.रुपाली बोडके व सौ. वैशाली भामरे यांनी केले. आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पगार डी. वाय. यांनी मानले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget